1 जूननंतर लगेचच सर्वकाही उघडणार नाही: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यभरातील व्यापार्‍यांनी 1 जूननंतर लॉकडाउन वाढवू नये अशी विनंती राज्य सरकारला केली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय कि, 1 जूननंतर लगेचच सर्वकाही उघडेल असे नाही. लॉकडाउन हळूहळूच उघडावा लागेल. राज्यात करोना संसर्गाची स्थिती नेमकी कशी आहे यांकडे पाहिलं जाणार आहे.

आपल्याला जसजसा लशीचा पुरवठा होत आहे, तस तसे लसीकरणही होत आहे, असे सांगतानाच चिंता करू नका, गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. लोकांचे प्राण महत्वाचे असून मागचा लॉकडाउन हटवल्यानंतर करोना बाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले. आता राज्यात करोना बाधितांची संख्या नक्कीच कमी होतेय, मात्र लगेचच सर्व सुरू होईल, असेही नाही असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय.

दरम्याण, मुंबईतील करोना संसर्ग देखील नियंत्रणात आला असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबईतील रुग्ण पूर्ण कसे घटतील याकडे सध्या आम्ही लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत अजूनही 1300 ते 1400 रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या पूर्णपणे कशी कमी होईल हा आमचा प्रयत्न असणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लॉकडाउन उघडणार की पुढे चालू राहणार याबाबत आत्ताच काही सांगू शकणार नाही, मात्र लॉकडाउन शिथील झाला तरी देखील लगेचच सगळे काही सुरू होईल असे होणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

You May Also Like