फोटोसेशनासाठी नव्हे तर मदतीसाठी आलोय; मुख्यमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

रत्नागिरी : रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालं आहे. वादळाचा या जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. मुंबईहून रत्नागिरी पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. वादळामुळे नुकसान झालेल्या शेती आणि फळबागांचं पंचनामे तत्काळ करावेत असे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मी इथे केवळ फोटोसेशनसाठी आलो नाही तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार आहे. मागील वर्षी सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर ठीक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोकण दौर्‍यावर आहेत.

You May Also Like