परिचारिकांचे धुळ्यात काम बंद आंदोलन

धुळे : विविध मागण्यासाठी परिचारिका संघटनेतर्फे राज्यस्तरीय आंदोलन सुरु आहे. त्यांना पाठिबा म्हणून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारीकानी काम बंद आंदोलन व रुग्णालय आवारात निदर्शने केली. अधिष्ठात्यांना निवेदन देत बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसांपासुन आंदोलन सुरु आहे. धुळे जिल्हा रुग्णालय, हिरे वैद्यकिय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय येथील परिचारीका, परिचर यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी परिचारीका संघटनेच्या राज्य संघटक तेजस्विनी चौधरी यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून परिचारीका संघटनेच्या मागण्या अद्यापही मान्य केलेल्या नाहीत. संघटनेने दि 22 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत काम बंद पुकारला. तसेच दि 23 रोजी संपुर्ण दिवसाचा संप पुकारला असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास 25 जून पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा राज्य परिचारीका संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा मनिषा शिंदे, शाहजाद खान, मंगला ठाकरे, भिमराव चक्रे, हेमलता गजबे, अरुण कदम, अजित वसावे, अमोल कवाने, सुकुमार गुडे, राम सुर्यवंशी आदींसह परिचारीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आंदोलनातील मागण्या सर्व स्तरावरील कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी. अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. परिसेविका, अधिसेविका, पाठयनिर्देशाका पदांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. राज्यातील परिचारीका संवर्गातील सर्व कर्मचारी यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखिम भत्ता (नर्सिग अलाउन्स) देण्यात यावा. कोव्हिड काळात 7 दिवस कर्तव्यकाळ व 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवायी, करोना काळात बंद केलेली साप्ताहीक सुट्टी ही देण्यात यावी. आदी मागण्या परिचारीका संघटनेने केल्या आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!