ओबीसी आरक्षण: छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर 

नवी दिल्ली । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.  भुजबळ ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळांच्या हस्ते शरद यादव यांचादेखील सत्कार होणार आहे. सोबतच ते लालू प्रसाद यादव यांची देखील भेट घेणार आहेत. रविवारी समता परिषदेची दिल्लीत बैठक होणार आहे.

 

 

यावेळीही ते ओबीसी आरक्षणासाठी महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. एकाच आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

You May Also Like