ऑलिम्पिक विरांचे भारतात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली । जुलै महिन्याच्या 23 तारखेला सुरु झालेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपली आहे. त्यामुळे सर्व देशांचे खेळाडू टोक्योमधून  आपआपल्या घरी परतू लागले आहेत. भारताचा हॉकी संघ आणि एथलेटिक्स संघ देखील नुकताच भारतात परतला आहे. एथलेटिक्स संघाती सदस्य 9 ऑगस्ट रोजी टोक्योतून नवी दिल्लीला पोहोचले. तर भारताची पुरुष आणि महिला हॉकी टीमेंही एकत्रच परतली.

 

 

दोन्ही संघ एकाच दिवशी आले असले तरी एथलेटिक्स संघ दुसऱ्या आणि हॉकी संघ दुसऱ्या विमानातून प्रवास करत होता. पण अखेऱ विमानतळावर पोहोचल्यावर तेथे उपस्थितांनी जंगी स्वागत केलं. जिंकून आलेल्या खेळाडूंना फुलांची माळ घातल त्यांचा गौरव केला. यावेळी उपस्थित नागरिक जोरजोरात घोषणार देत जल्लोष करत होते.

You May Also Like