पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर प्रवासासाठी ‘ई-पास’ अर्ज विनंती अर्ज

पुणे : राज्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या हि भयावह आहे. हि स्थिती आता आवाक्या बाहेरची झाली असून, हि स्थिती हाताळता यावी म्हणून शासनाने ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अधिक कडक केले असून, प्रवासावर देखील कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम 1 मे पर्यंत लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता राज्य शासनाने एका जिल्हयातून दुस-या जिल्ह्यात तसेच पुणे शहरातून इतर जिल्हयात जाण्याकरिता https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवार (दि.23) पासून शहर पोलीस दलांकडून ई- पास देण्याकरिता डिजीटल कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2077 इतके विनंती अर्ज ई-पास साठी क्षाकडे प्राप्त झाले असून, त्यापैकी 286 नागरिकांना डिजीटल पास देण्यात आले आहेत तर 375 नागरिकांची आवश्यक कागदपत्रे नसल्याने नाकारण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजीटल कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या डिजीटल कक्षामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 20 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

You May Also Like