सापडलेली दीड लाखांची रोकड मालकाच्या स्वाधीन

शहर पोलिसांच्या भुमिकेचे कौतूक
धुळे : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांना मिळालेली एक लाख 47 हजाराची रोकड संबंधीताचा शोध घेत पोलिसांनी परत केली. त्या बेवारस पिशवीत रोकडसह मिळालेल्या आधारकार्डवरुन मालकाचा शोध घेतला. पैसे परत मिळाल्याने पोलिसांच्या भुमिकेचे कौतूक करण्यात येत आहे.

येथील मुख्य बसस्थानकाच्या आवारात शुक्रवारी (ता.28) सायंकाळी सहाच्या सुमारास बेवारस पिशवी सापडली. त्या पिशवीत 1 लाख 47 हजारांची रोकडसह आधारकार्डही होते. आधारकार्डवरुन तपास केला असता ते भिकन महादु पाटील (रा.मंगरुळ ता.पारोळा) यांचे असल्याचे आढळले. पोलिसांनी माहिती मिळवित त्यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर पिशवीती ती रोकडही त्यांचीच असल्याचे आढळले. भिकन पाटील यांची बहीण कल्पना पाटील या आज शहर पोलिस ठाण्यात आल्या, खात्री पटवून त्यांना पैसे परत देण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, हवालदार बालमुकुंद दुसाने, गुणवंत पाटील, रणजीत वळवी, मनिष सोनगीरे, प्रविण पाटील, नरेंद्र परदेशी यांनी चौकशी केली. पैसे परत मिळवून दिल्याबद्दल कल्पना पाटील यांनी पोलिसांचे आभार मानले.

You May Also Like