’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठानं आज याबाबतचा निकाल दिला आहे. वन नेशन, वन रेशनकार्ड योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आज मोठा निकाल दिला आहे.

 

देशातील सर्व राज्यांनी तातडीनं ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरुन प्रवासी मजुरांना देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, असं कोर्टानं म्हटलं आहे. कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांना यावेळी सुप्रीम कोर्टानं उत्तम नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रवासी मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करुन देणं आणि त्यांच्यासाठी ’कम्युनिटी किचन’ यापुढील काळातही सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like