श्री मंगळदेव ग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना भारत क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा

अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळदेव ग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना भारत क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या सुविधेचे उद्घाटन केले.

‘सायकलिंग करा व शरीर तंदुरुस्त ठेवा ‘असा संदेश देत धुळ्याच्या सायकलिंग ग्रुपने २० रोजी सकाळीच धुळ्याहून सायकलिंग करत मंगळ ग्रह मंदिर गाठले. या ग्रुपमध्ये जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाबराव पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, व्यापारी, उद्योजक, वैद्यकीय व न्यायक्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते. या सर्वांनी मंदिराचे दर्शन घेऊन नयनरम्य मंदिर परिसराची पहाणी केली. मंदिराची व परिसराची एकूणच स्वच्छता व सौंदर्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील व सचिव एस.बी.बाविस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले.

You May Also Like