महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. निवडणूक नको व्हायला हवी होती. पण कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे, त्याचे प्रश्न दिल्लीत विचारले जातात. याबाबत एकतर विधीमंडळ सचिव, संसदीय कार्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. मी अथॉरिटी नाही. याबाबतचं उत्तर मी देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने ते पद रिक्त झालं. कोव्हिड काळात तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन निवडणूक घेणं हे सद्यस्थितीत टाळायला हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. ते योग्यच होतं. मात्र आता निवडणूक आहे, तिन्ही पक्ष निर्णय घेतील. आज महाराष्ठ्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. त्यांची टेस्ट केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत एखादा आमदार बाहेर राहिला तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार. विरोधकांनी निवडणूक टाळली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचं वातावरण तयार केलं तरीही विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असा चिमटा राऊत यांनी काढला.

You May Also Like