अन्यथा धनादेश होणार बॉउंस; धनादेशच्या नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली ।  धनादेशच्या माध्यमातून पेमेंट करणार असाल तर नक्कीच काळजी घ्यायला हवी. रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकेच्या नियमांमध्ये नुकतेच काही बदल केले आहेत. हे बदल या महिन्याच्या सुरूवातील म्हणजेच 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहेत. जर तुम्ही धनादेशद्वारे पेमेंट करणार असाल तर या नियमांबाबत माहिती असायलाच हवी.

धनादेशच्या पेमेंटवर होणार परिणाम
आरबीआयने 24 तास आता बल्क क्लिअरिंग सुविधा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम तुमच्या धनादेश पेमेंटवर होणार आहे. सध्या धनादेश पेमेंट होण्यास दोन दिवसांचा वेळ लागतो. परंतु या नियमांनंतर दोन दिवसांचा वेळ लागणार नाही.   त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवावे लागतील. जर तुम्ही हा विचार करून चेक देत असाल की उद्या आपल्या खात्यात्या पैसे टाकू आणि आज चेक क्लिअरिंगला देऊ तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. चेक बॉउंस होऊ शकतो. म्हणून चेक देण्याआधी तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम चेक करा मग चेक क्लिअरिंगला द्या.

 

 

You May Also Like