..अन्यथा आम्हीच दुकानं उघडू, एमआयएम नतंर भाजपचाही इशारा

भाजपाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : करोनाची साखळी तोडण्यासाठी 1 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, आता 1 जूननंतर दुकानं उघडू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि दुकानं उघडू द्यावे, अशी मागणी केली आहे. तसंच, दुकानं उघडण्यास परवानगी नाही दिली तर आम्हीच दुकानं उघडू, असा इशाराही राज्य सरकारला दिला. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सचिव प्रतीक कर्पे, व्यापारी प्रतिनिधी विरेन शहा,विनेश मेहता, मोहन गुरनानी, यांच्या आदींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

दरम्याण, महाराष्ट्रमध्ये 20 लाखांहुन अधिक दुकानदार, व्यापारी आहेत. त्यांच्यावर अवलंबून अनेक लोक आहेत. मात्र हे सर्व सध्या बंद आहे. यामुळे मोठं नुकसान होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढणार आहे, तेव्हा दुकाने सुरू करायला परवानगी द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. तसंच, रिक्षा चालकांपासून सगळ्यांना सरकारने मदत केली आहे, आम्हाला सरकारने मदत केलेली नाहीये. जर 1 जूनपासून दुकाने सुरू करायला परवानगी दिली नाही तर दुकाने आम्ही उघडणार, असा इशाराही भाजपने दिलांय.

खासदार जलील यांचा इशारा
राज्य सरकारनं राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा निर्बंध वाढवले तरी 1 तारखेला औरंगाबादमधील दुकानं सुरू करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ’लोक आत्महत्या करत आहेत. सरकारनं त्यांच्या अडचणी दूर कराव्यात, केवळ टिव्हीवर येऊन ज्ञान दिल्याने लोक ऐकणार नाही. लॉकडाऊन लावायचंच असेल तर लोकांच्या अडचणी आधी सोडवा, तसं केलं नाही तर आम्ही दुकाने उघडणार सरकारनं काय करायचं ते करून घ्यावं, असं जाहीर आव्हानाच जलील यांनी दिले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!