आमचं सरकार पाच वर्ष चालेल; नाना पटोले

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांसह बंड केल्यामुळे मवि सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांनी २४ तासात या, त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे सूचक वक्तव्य केले आहे, यावरुन आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रीया येत आहेत.

संजय राऊत यांच्या प्रतिक्रीयेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. काँग्रेस पाठिंबा देणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत राहणार आहे.

भाजपकडे सत्तेसाठी बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे
भाजप अस्थिरता निर्माण करत राज्याचे नूकसान करत आहे. भाजप अजुनही शांत आहे, कारण त्यांच्याकडे अजुनही संख्याबळ नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

संजय राऊत यांचे वक्तव्य हे शिवसेनेतील अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस आहे. वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये बाहेरुन पाठिंबा देऊ, असेही नाना पटोले म्हणाले. जर वेगळ काही घडले तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार असल्याचे पटोले म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like