आरक्षणासह 16 मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा

आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला मागण्यांचे दिले निवेदन
धुळे : मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात तसेच अन्य 16 मागण्यांसाठी जिल्हा आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कल्याण भवनापासून प्रारंभ झाला. मोर्चात कर्मचारी कुटुंबासह सहभागी झाले होते.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कल्याण भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शिवतीर्थ मार्गे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आला. तेथे पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा जेलरोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

या मोर्चाला प्रदेश प्रतिनिधी शिवानंद बैसाणे, जिल्हा निमंत्रक राजेंद्र भामरे, दीपक शिंदे, वाल्मीक येलेकर, किशोर पगारे, रवींद्र मोरे, देविदास जगताप, नरेंद्र खैरनार, दिनेश महाले, राहुल खरात, विलास मालचे, अविनाश सोनकांबळे, कुणाल वाघ, विठ्ठल घुगे, चुडामण बोरसे, सुरेश बैसाणे, जितेंद्र अहिरे, सुरेंद्र पिंपळे, भूपेश वाघ, वाल्मीक पवार, सुरेश पाईकराव उपस्थित होते. दरम्याण, बंद केलेली फ्रिशिप योजना, शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट रद्द करावी, नोकरीतील अनुषेश भरून काढण्यासाठी कार्यक्रम राबवावा, ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत व पदोन्नतीत आरक्षण द्यावे, सरकारी उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटीकरण थांबवण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला सरकारतर्फे 50 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

 

You May Also Like