संतापजनक 70 वर्षीय व्यक्तीने केला 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार संतापजनक घटना

पुण्यातील येथील कोंढवा येथे पैसे देण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती
अशी की, कोंढवा येथे राहणाऱ्या 70 वर्षीय आरोपी व पीडित मुलीच्या आईची तोंडओळख होती. ओळखीचा फायदा घेत आरोपी हा पीडित मुलीचे आई-वडील घरी नसताना मुलीला पैसे देऊन तिच्यावर बलात्कार करायचा. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी देखील त्याचे हे घृणास्पद कृत्य सुरू असताना पीडित मुलीची आई अचानक घरी आली आणि तिने हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यानंतर तिने तातडीने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली आहे.

You May Also Like