देशात गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा

नवी दिल्ली  : करोनामुळे  देशात चिंतेचं वातावरण आहे. शुक्रवारी चोवीस तासात देशात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही 32 लाखाहून अधिक झाली आहे.

त्यामुळे देशातल्या करोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like