पद्मभूषण पंडित राजन मिश्रांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे आज (रविवार) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.  करोना संसर्गाबरोबरच हृदयविकाराशी संबंधित त्रास उद्भवल्याने आज सकाळी त्यांची तब्येत खालवली होती, यामुळे त्यांना दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सलीम मर्चंट यांनी ट्विटरवर राजन मिश्र यांच्या निधनाची माहिती दिली.

राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलं. बनारस घराण्याशी ते संबंधित होते. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड, ऑस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, यूएसएसआर, कतार, बांगलादेशसह अनेक देशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like