पाकिस्तानच्या तरूणींच भारतीय तरूणावर जडलं प्रेम; मोदींना केली विनंती

कराची : प्रेमाला कशाचंही बंधन नसतं. प्रेमात जात-धर्म आणि अगदी सीमाही ओलांडल्या जातात. असं एक प्रकरण आता पाकिस्तानातून समोर आलं आहे. पाकिस्तानातील एका तरुणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी मागणी केली आहे, की तिला भारताचा व्हिसा दिला जावा, जेणेकरून ती भारतात येऊन आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधू शकेल.

या तरुणीचा बॉयफ्रेंड भारतीय नागरिक आहे. पाकिस्तानच्या कराची येथे राहाणार्‍या सुमन रंतीलाल हिला दीड वर्षापूर्वी भारतातील रहिवासी असलेल्या अमितवर प्रेम झालं. हे दोघंही तेव्हापासूनच प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आहेत. याच कारणामुळे सुमननं बॉर्डर क्रॉस करण्यासाठी मोदी सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे.

सुमन एक शिक्षिका आहे. ती सध्या एम.फिल करत आहे. सुमननं पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायोगात आपल्या ट्रॅव्हल व्हिसासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा केली आहे. मात्र, करोनाच्या प्रकोपामुळे तिला व्हिसा मिळालेला नाही. सुमनचा बॉयफ्रेंड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या श्री हरगोबिंदपुर येथे राहातो. साल 2019 मध्ये सुमन आणि अमित फेसबुकद्वारे भेटले होते. यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि आता या दोघांनाही लग्नगाठ बांधायची आहे. 2020 पासूनच कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे सुमनला भारतात प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like