पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी नुकताच सभापती पदाचा राजीनामा

धरणगाव : धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नुकताच सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, खुल्या जागेवर एका मागासवर्गीय व्यक्तीला सभापतिपद दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

मुकुंदराव नन्नवरे यांनी सव्वा वर्षाचा कालावधी ठरल्याप्रमाणे पूर्ण केल्यानंतर सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. नामदार गुलाबराव पाटील यांनी सर्वसाधारण संवर्गाची जागा असतानाही सभापतीपद दिलं होत. माझ्या कार्य काळामध्ये अनेक वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये शौचालयाच्या वैयक्तिक लाभ असेल सार्वजनिक शौचालय असतील शेळीपालन असेल कृषीच्या विविध योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीचे अवजारे, शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप तसेच बेरोजगारांना ट्रॅक्टर दिलीत,असे श्री. नन्नवरे यांनी सांगितले. ज्यांना राहायला घर नव्हते अशां गरिबांना रमाई आवास योजना, सब्री बिल्डर आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना सेलच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेला घरकुल देऊन त्यांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. सभापतीपदावर काम करत असताना मागच्या काळामध्ये तालुक्यात 30 हायमास्ट लाईट तर आता तालुक्यातील 30 जिल्हा परिषद शाळांना गरिबांच्या पोरांना आरओचे पाणी शुद्ध पाणी मिळावं यासाठी तालुक्यामध्ये तीस ते बत्तीस शाळांमध्ये आरोचे प्लांट बसवण्यात येणार आहेत. तालुक्यासाठी कोरोनाच्या काळातही जे-जे चांगलं करता आलं, यासाठीं नामदार गुलाबराव पाटील साहेबांचं मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी कामे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रमध्ये हे एकमेव उदाहरण असेल की, शिवसेनेना आणि नामदार पाटील साहेबांनी मला सर्वसाधारण जागेवर तालुक्याचा प.स. सभापती हे सर्वोच्च पद दिलं. म्हणून मी माझ्या समाजाचचा केलेला सन्मान लक्षात घेता नेहमी शिवसेनेसाठी सक्रिय असं काम करणार असल्याचेही श्री. नन्नवरे यांनी नम्रपणे सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!