…’तर योगींच्या छातीवर बसून हाडं मोडली असती’,’या’ पक्षाच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

पाटणा : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर जाहीर सभेत बोलताना बिहारमधील जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांची जीभ घसरली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट धमकीच दिली. एकाच राज्यात जन्मलो असतो तर, योगी आदित्यनाथ यांच्या छाताडावर बसून त्यांची ३२ हाडं मोडली असती, असं वादग्रस्त विधान यादव यांनी केलं.

बिहारच्या समस्तीपूरमध्ये जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, योगी उत्तर प्रदेशात आहेत आणि मी बिहारमध्ये आहे हीच चूक झाली.

जर आम्ही दोघे एकाच राज्यात जन्मलो असतो, तर आपण त्यांच्या छातीवर चढून ३२  हाडे मोडली असती. ते म्हणतात की मी बदला घेईन म्हणून काय त्यांनाच फक्त बदला घ्यायला येतो का? शेराला सव्वाशेर आहेत. हिटलरचा इतिहास पुसला गेला त्या ठिकाणी तुम्ही (योगी) कोण आहात?

तुमच्याकडे कागदपत्रे मागितली तर द्या आणि सांगा की, वाहून गेली. कारण आम्ही पूरग्रस्त भागात राहतो. माहिती भरण्यास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सांगा रातांधळेपणा आहे. ऐकायला सांगितलं तर सांगा की आम्ही ऐकू आणि बोलू शकत नाही. कोणत्याही कागदावर सह्या करू नका,’ असं पप्पू यादव यांनी उपस्थित जनतेला सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

 

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.