परमबीर सिंह: खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल

मुंबई ।  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. यापुर्वी मुंबईचे परमबीर सिंग यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

 

 

दरम्यान , गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा चौथा गुन्हा आहे. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने ९ लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. जानेवाती २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा अरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

You May Also Like