शाळा शुल्क सवलतीसाठी  पालकांचे आंदोलन

नाशिकरोड :  पालकांनी पंधरा हजार रुपये भरल्याशिवाय पाल्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, आठमुठेपणाची भूमिका जेलरोड येथील के. एन. केला शाळेने घेतल्याचा आरोप करत पालकांनी शाळेत जमिनीवर बसून आंदोलन केले.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाचे मुकुंद दीक्षित व जितेंद्र भावे यांनी शाळेला भेट दिली. पालकांची व शाळेची बाजू ऐकून घेतली.

शाळेकडून बेकायदेशीरपणे फी वसुल केली जात असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दोन वर्षापासून करोना संकटामुळे शाळा बंद आहे. तरीही शैक्षणिक साहित्य व अन्य शुल्क शाळा जबरदस्तीने आकारत असल्याचा पालकांचा आरोप आहे.

करोना काळात शाळेत विद्यार्थी नव्हते. करोनामुळे विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या वापरल्या नाहीत. विद्यार्थी शाळेत गेले नाहीत, दर्जेदार शिक्षण दिले गेले नाही तर ती अवांतर शुल्क कसे भरायचे, असा प्रश्न उपस्थित करून पालकांनी ठिय्या आंदोलन करीत शाळेचा निषेध केला. पालकांनी या आधीही शाळेच्या प्रशासनाला भेटून योग्यरित्या फी आकारणीची मागणी केली होती.

You May Also Like