कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात लक्षणीयरित्या वाढलेले रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा घसरला आहे. नवीन रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र दुसरीकडे मे महिन्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या धडकी भरवणारी आहे. दर तासाला 28 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. या संदर्भात राज्य सरकारने एक कोरोनाचा रिपोर्ट जारी केला आहे.

हा रिपोर्ट खूपच भयावह आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात लक्षणीयरित्या वाढलेले रुग्ण आणि मे महिन्यात कमी झाले. पण त्याच वेळी मृत्यूचा आकडा मात्र कमी झालेला नाही. दर दिवशी सरासरी 671 आणि प्रति तास सरासरी 28 कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. ही खूप चिंताजनक बाब आहे.

दरम्यान, एप्रिलमध्ये 17,89,406, तर मे महिन्यात 11,55,570 रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात मे महिन्यापेक्षा सर्वात जास्त रुग्ण आढळूनही 13,835 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी मृत्यूदर 0.77 टक्के होता. पण मे महिन्यात एप्रिलपेक्षा कमी रुग्णसंख्या असताना 20,801 मृत्यूची नोंद झाली. यासोबतच मृत्यूदर 1.80 टक्क्यांवर पोहोचला.

You May Also Like