शहरातील विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामगार बांधवांना पेंशन तसेच नोंदणी

जळगाव शहरातील विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामगार बांधवांना पेंशन तसेच नोंदणी संदर्भात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी जळगाव काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अमजद पठाण यांनी राज्याचे ग्राम विकास, व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर करून कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी कामगार बांधवांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असा विश्वास दिला.

You May Also Like