आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी – नागराज मंजुळे

मुंबई । दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सिनेमे समाजाला अंतर्मुख करणारे असतात. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या तरी आजही तितक्याच ताज्या वाटणाऱ्या प्रश्नावर नागराज मंजुळे यांचे सिनेमे भाष्य करतात. त्यांचा ‘झुंड’ हा सिनेमा झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवत असताना नागराज यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत. तसंच “सिनेमा काढून समाज बदलत नाही,” असंही नागराज म्हणाले. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते.
“जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे.पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय.कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं.पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

You May Also Like