CoronaVaccine : भारतात रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली: सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. तर आता भारतात तिसऱ्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे.

दरम्यान, रशियाच्या स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे भारताच्या करोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे. स्पुटनिक लसीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची माहिती तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचा तेथील आरोग्य मंत्रालयाने अंतरिम निष्कर्षांत म्हटलं आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like