पेट्रोल – डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार?

नवी दिल्ली ।  आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही घडामोडी भारतासाठी दिलासादायक ठरु शकतात. येत्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल. परिणामी आगामी दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी खाली येऊ शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, खनिज तेलाचे उत्पादन वाढल्यास प्रतिबॅरल भाव 65 रुपयांपर्यंत खाली येईल. त्यामुळे भारताला खनिज तेलाच्या आयातीसाठी कमी पैसे मोजावे लागतील. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दिसून येईल, असे अनुज गुप्ता यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये आजचा दर

औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97

मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71
नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85

You May Also Like