पिंपरी चिंचवड येथे लोखंडी रॉडने मॅनेजरची हत्या

पुणे ।  एका तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या  करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे.  संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पिंपरी -चिंचवडच्या चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नानेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीचा मॅनेजर अमोल गजानन राणे याची हत्या झाली आहे. अनैतिक विवाह बाह्य संबंधातून झाल्याच स्पष्ट झालं आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमोल राणे याच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ते फूटेज पोलिसांच्या हाती लागेल आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे की, भवानी इंडस्ट्रीतील कामगार रामेश्वर वामन पवार हा अमोल राणे याला लोखंडी रॉडणे मारत आहे. आरोपी रामेश्वर पवार याच्या बायकोचे अमोल राणे यांच्याशी अनैतिक विवाह बाह्य संबध आसल्याचा संशय रामेश्वर पवार याला होता. याच संशयातून रामेश्वर पवार याने अमोल राणे याचा लोखंडी रॉडने मारून खून केला.

You May Also Like