पंतप्रधान मोदींनी नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी केली लाँच

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी लॉन्च केली आहे.  पंतप्रधान मोदी म्हणाले की,’ हि पॉलिसी देशातील अनफिट वाहने वैज्ञानिक पद्धतीने काढण्यात मोठी भूमिका बजावेल.’ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते.

 

 

 पॉलिसीचे सांगितले फायदे 
सामान्य कुटुंबांना या पॉलिसीचा हरप्रकारे मोठा फायदा होईल. रस्ते अपघातासारख्या धोक्यांपासून मुक्तता मिळेल हा पहिला फायदा होईल. जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यातून सुटका होईल. यासह, या पॉलिसीमुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि देखभाल खर्च, दुरुस्ती खर्च, जुन्या वाहनाची इंधन कार्यक्षमता देखील वाचविणार आहे.

 

You May Also Like