रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; फिल्म इंडस्ट्रीतील 4 महिलांचा समावेश

हिना पांचाळला अटक; मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींचाही समावेश
नाशिक : मुंबईपासून जवळचं असलेल्या इगतपुरीमध्ये नाशिक पोलिसांनी एका बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या कारवाईत 10 पुरुष आणि 12 महिलांसह एकूण 22 जणांना अटक केली होती. रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांची नावं समोर आली असून, यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत सहभागी झालेल्या 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पार्टीतील लोकांबरोबरच स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ङ्गबिग बॉस मराठीफ फेम अभिनेत्री हिना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री व बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी पहिला व पुरूष मादक द्रव्यासह नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कारवाई केली होती.

You May Also Like