“देशाला लागलेली कोविडपेक्षा भयाण आणि घातक कीड म्हणजे राजकारण”

मुंबई : देशात करोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या अधिकाधिक वाढत आहे. अशात लसींचा तुटवडा, रेमडेसिवीर औषधाची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यात रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. या करोना संकटासंदर्भात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने एक पोस्ट केली आहे. राजकारण ही कोरोनापेक्षा घातक कीड असल्याचे तिने म्हटले आहे.

इन्स्टा स्टोरीवर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे.  सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’… ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वषार्नुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच….काळजी घ्या, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले असून, तिचा ‘मी सिंधुताई सकपाळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने यासोबतच तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

 

You May Also Like