लोकप्रिय गायक अर्जित सिंगच्या आईनं घेतला अखेरचा श्वास; करोनानं निधन

कोलकाता : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं करोनामुळे निधन झालंय. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी त्या कोलकात्याच्या एका रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तिथे त्यांची तब्येत ढासळली. गुरुवारी सकाळी 11 वाजताच त्यांचं निधन झालं.

बंगाली अभिनेत्री स्वस्तिकाने अरिजीतच्या आईविषयी पोस्ट केली होती. अरिजीतच्या आईला दुर्मीळ असलेल्या – निगेटिव्ह रक्ताची उपचारादरम्यान आवश्यकता होती. यासाठी कोलकात्यातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. बंगाली फिल्म मेकर श्रीजित मुखर्जी यांनीसुद्धा अरिजीतच्या आईसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. अखेर अरिजीतच्या आईची कोरोनाविरुद्धतची लढत अपयशी ठरली. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरिजीत सिंग 2005 पासून चित्रपटसृष्टीसाठी गात आहे. त्याचा रिअ‍ॅलिटी शोमधला सहभागही गाजला होता. आशिकी 2 नंतर अरिजीतचं नाव खर्‍या अर्थाने लोकप्रिय झालं. पश्चिम बंगामध्ये निवडणुकीनंतर करोनाचा कहर झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासांत या राज्यात कोरोना बळींचा उच्चांकी आकडा समोर आला आहे.

You May Also Like