ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या फोनमध्ये अश्लील व्हिडीओ; खेळाडूला अटक

डार्व्हिन : ऑस्ट्रेलियाच्या एका युवा खेळाडूला बाल लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आली. अ‍ॅरोन समर्स असे या खेळाडूचे नाव आहे. त्याच्यावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ ठेवण्याचा आरोप आहे. १७  मे रोजी डार्व्हिन येथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर केले गेले. समर्सनं नुकतंच अबू धाबी येथे झालेल्या टी १०  लीगमध्ये सहभाग घेतला होता. या लीगमध्ये तो डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचा सदस्य होता.

२४ वर्षीय जलदगती गोलंदाजाच्या मोबाईलमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओ आहेत. शिवाय १० मुलांसोबत संपर्क असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या मुलांकडूनही अश्लील फोटो मागवण्याचा प्रयत्न झाला. दोन मुलांसोबत सेक्शुअल कंटेंट ठेवण्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्यानं एका मुलाला त्यासाठी फुस लावली असल्याचे सांगण्यात येतयं.

You May Also Like