नाशिकचा ‘आय अ‍ॅम ए ऑडिबल’ सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ; पोर्टब्लेअर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल

नाशिक : अंदमानातील पोर्टब्लेअर आंततराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकचे वास्तुविशारद विजय पवार यांचा वैभव नरोटे निर्मित ‘आय एम ए ऑडिबल’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट म्हणून ठरला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विजय पवार यांना गौरविण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोना काळात शाळा बंद झाल्यापासून ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आयुष्यात झालेल्या विविध परिस्थितीचे, मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या दुर्गम, ग्रामीण भागातील वैश्विक संघर्षांचे चित्रण पवार यांनी या लघुपटात दाखविले आहे.

करोनाच्या आपत्तीकाळाचा जितका परिणाम औद्योगिक, व्यापार, सामाजिक क्षेत्रांवर झाला. त्यापेक्षा अधिक दूरगामी परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. शिक्षण ऑनलाइन झाल्याने सर्वाचाच भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) पाहण्याचा वेळ वाढला. मग मिळेल त्या खोलीत, उपलब्ध जागेत, मिळेल त्या साधनांसह एका वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात शिक्षणासाठी परिस्थितीशी कसा संघर्ष करावा लागला, झगडावे लागले. याचे यथार्थ चित्रण या लघुपटात येते.

शहरांमध्ये एकीकडे सर्व साधनसुविधा असतांनाही शिक्षणात अडथळा येत होता. त्याचवेळी ग्रामीण भागात मूलभूत गरजांसाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू होता. एका भ्रमणध्वनीवर चार-चार मुले शिकत होती. कधी रिचार्जला पैसे नव्हते. तर कुठे चार्जिगसाठी वीज नव्हती. कुठे भ्रमणध्वनीला संपर्कच नाही. अशाही परस्थितीत शिक्षणाची प्रचंड इच्छा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनसामग्रीसह शिक्षण मिळविण्यासाठी धडपड सुरू केली.

हा संघर्ष फक्त विद्यार्थ्यांंचाच नव्हता तर, शिक्षकही विद्यार्थ्यांंपर्यंत पोहचण्यासाठी धडपडत होते. याच संघर्षांची मूळ गोष्ट या लघुपटाच्या माध्यमातून जगभर पोचविण्यात लेखक-दिग्दर्शक विजय पवार यशस्वी झाले आहेत. तीन महिन्यात जगभरातल्या १३ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाची निवड झाली आहे. पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार मिळवत या लघुपटाने आंतरराष्ट्रीय लघुपटांशी स्पर्धा करुन सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान प्राप्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

 

You May Also Like