राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता :विजय वडेट्टीवार

पुणे : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. त्यामुळे, 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारने 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. पण, त्यापुढेही लॉकडाऊन वाढणार असल्याचं अनेकांचं मत आहे. त्यातच, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like