पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात

मुंबई : पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात. पोस्टाच्या अनेक योजना प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा फायद्याची आहे.

या योजनेत दररोज फक्त 95 रुपयांची बचत केली तरी 14 लाख रुपये मिळू शकतात. विशेष म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर जीवंत असल्यास मनी बॅकचाही फायदा मिळतो. म्हणजेच जितकी गुंतवणूक केली ती परत मिळते.

ग्राम सुमंगल योजनेत लाभार्थ्यांना मॅच्युरिटीवर बोनसही मिळतो. ही योजना 2 कालावधीसाठी मिळते. पहिली 15 वर्षे आणि दुसरी 20 वर्षे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी वय 19 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त 45 वर्षे आहे.

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन वीमा योजनेत मनी बॅकची सुविधा आहे. यात खातेधारकाला जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचा सम अश्युर्ड मिळतो. जर पॉलिसीधारक योजनेच्या मॅच्युरिटीपर्यंत जीवंत राहिल्यास मनी बॅकचा लाभ मिळतो. हा लाभ तीन वेळा मिळतो. 15 वर्षांच्या पॉलिसीत 6 व्या वर्षी, 9 व्या आणि 12 व्या वर्षी 20-20 टक्के पैसे मिळतात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित 40 टक्के पैसे मिळतात.

20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी मनी बॅक स्वरुपात 20-20 टक्के पैसे मिळतात. उर्वरित 40 टक्के पैसे मॅच्युरिटीनंतर मिळतात. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला योजनेच्या रकमेसह बोनस दिला जातो.

जर 25 वर्षांचा व्यक्ती 7 लाख रुपयांच्या सम अश्युर्डसह 20 वर्षांची पॉलिसी घेत असेल तर त्याला दर महिन्याला 2853 रुपये हप्ता द्यावा लागेल. म्हणजेच दररोज 95 रुपये जमा करावे लागतील. याप्रमाणे वार्षिक हप्ता 32,735 रुपये होतो. जर 6 महिन्याला द्यायचे असेल तर 16,715 रुपये आणि तीन महिन्यासाठी 8,449 रुपये भरावे लागतात.

पॉलिसी 20 वर्षांची असेल तर 8 व्या, 12 व्या आणि 16 व्या वर्षी 20-20 टक्के हिशोबाने प्रत्येकी 1.4 लाख रुपये मिळतील. 20 व्या वर्षी 2.8 लाख रुपयांची सम अश्युर्ड रक्कम मिळेल. याशिवाय 48 रुपए प्रति हजार वार्षिक बोनस यात समाविष्ट होईल.

त्याप्रमाणे वार्षिक बोनस 33,600 रुपये होईल. 20 वर्षांमध्ये बोनसची ही रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशाप्रकारे विमा धारकाला एकूण 13.72 लाख रुपयांचा फायदा होईल.

You May Also Like