सुप्रसिद्ध अभिनेता, साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ या तामिळ चित्रपटाची घोषणा करत शुक्रवारी (17 जून) चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले पोस्टरही रिलीज केले आहे. जेलर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून रजनीकांत च्या चाहत्यांना आश्चर्य चा सुखद धक्का दिला आहे. या पोस्टरमध्ये चाकूवर रक्त दिसत आहे. जो एका साखळीवर लटकला आहे. तामिळ आणि हिंदी भाषेत हे पोस्टर रिलीज केले गेले आहे.
या चित्रपटासाठी रंजनीकांत यांनी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले आहे. सन पिक्चर्सने जेलरच्या पहिल्या पोस्टरसह शीर्षक शेअर केले आहे. या चित्रपटात कन्नड अभिनेता शिवराजकुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकर च या चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…