प्रकाश आंबेडकरांकडून भिडे, एकबोटेंना वाचवण्याचा प्रयत्‍न – जयंत पाटील

मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिंडेंना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील धडपड करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एकंदरीत संभाजी भिंडे यांच्यावरून पाटील-आंबेडकर आमने-सामने आले आहेत.

पोलीस अधिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील होते. आता जयंत पाटील त्यांचा बचाव करतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच भाजपचं काम महाविकास आघाडीतील काही मंत्री करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

त्यावर जयंत पाटील म्हणाले, माझा या प्रश्नाची कधीही संबंध आला नाही. आमचे नेते शरद पवार यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी करावी अशी मागणी यापूर्वीच केली होती. त्यामुळे ज्यांनी दंगलीव करून षडयंत्र केलं त्या सर्वांना प्रायश्चित्त आणि शासन व्हावं हीच आमची प्रमुख मागणी आहे. मग यात संभाजी भिडे, एकबोटे किंव्हा कोणीही असतील तरी जे कोण सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वेळी जी चौकशी झाली त्या चौकशीने महाराष्ट्रातील जनता समाधानी नाही. शरद पवार यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केल्यानंतर खडबडून जागे होऊन काहीतरी वेगळा विचार डोक्यात ठेवून केंद्र सरकारने आता भीमा-कोरेगाव संदर्भात एनआयएकडून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमून या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करणं गरजेचं असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.