महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकार्‍यांशी साधला पंतप्रधान मोदींनी संवाद

मुंबई : राज्यातील करोनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यामुळे या दोन बैठकांनंतर महाराष्ट्राच्यादृष्टीने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काहीवेळापूर्वीच जिल्हाधिकारी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेला प्रारंभ झाला. वाढता करोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, करोना लसीकरण कसे वाढवू शकतो, आदी विषयांवर पंतप्रधान मोदी जिल्हाधिकर्‍यांशी संवाद साधला. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राजेंद्र भोसले यांनी अहमदनगरमध्ये राबवण्यात येत असलेल्या करोना उपाययोजनांची माहिती मोदींना दिली. तर आदर्शगाव हिवरेबाजार कसे करोना मुक्त झाले, हेदेखील जिल्हाधिकार्‍यांनी मोदींना सविस्तरपणे सांगितले.

अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी, बीड येथील जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत.

You May Also Like