पंतप्रधान मोदींची उद्या उच्चस्तरीय बैठक; पश्चिम बंगाल दौरा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचा हाहाकार माजला आहे, दर दिवशी करोना रुग्ण संख्येचा एक नवा उच्चांक करोना गाठत आहे. त्यातच आरोग्य सेवेंचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. देशातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याने हा दौरा रद्द केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. देशातल्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दिल्लीबरोबरच अन्य काही राज्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचं सांगितलं आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेशही दिले आहेत.

तसेच, अनेक राज्यांना भासत असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचं उत्पादन वाढवणं, त्याच्या वितरणाचा वेग वाढवणं आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like