लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणूनच पहावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कठीण परिस्थितीतही आपण धैर्य सोडू नये. आपण योग्य प्रयत्न केले तर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. हेच डोळ्यासमोर ठेवून देश आज दिवसरात्र काम करतोय. गेल्या काही दिवसांत घेतलेले निर्णय परिस्थिती सुधारेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे त्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजनची निर्मिती करण्यावरही प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न केले जात आहे. यावेळी करोनाच्या केसेस वाढल्या वाढल्याच देशातील फार्मा कंपन्यांनी औषध कंपन्यांनी उत्पादन वाढवलं आहे. औषध कंपन्या अजूनही उत्पादन वाढवत आहेत. अनेक कंपन्यांची मदत घेतली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

तसेच, “सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल”, असं मोदी यावेळी म्हणाले.

देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना “करोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत”, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

तसेच, “आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाऊनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण आर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याती देखील काळजी घेऊया”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“यावेळी करोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले”, असं म्हणत मोदींनी देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं कौतुक केलं.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE


			

You May Also Like