पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रात्री ८ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. दरम्यान केंद्र शासनाकडून  करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असूनही रूग्ण संख्येतील वाढ थांबत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शनिवार) रात्री ८ वाजता एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत मोदी विविध विविध मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या अगोदर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्याबरोबर बैठक घेतलेली आहे.

या बाबत माहिती अशी कि,  पंतप्रधान मोदी करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लसीकरण मोहिमेबद्दल या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींनी नुकतीच आरोग्य, रस्ते परिवहन मंत्रालयासह अन्य मंत्रालये आणि विभागांशी चर्चा केलेली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like