कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत तुरुंग अधिकाऱ्याच्या छळाची तक्रार

नाशिक :  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अविनाश जाधव या कैद्याने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न  केल्याने कारागृहामध्ये एकच खळबळ उडाली. घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनही हादरले. दरम्यान या  कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याअगोदर चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत तुरूंग अधिकारी अशोक कारकर, बाबर, निंबाळकर यांची नावे असल्याने पुन्हा एकदा कारागृहाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे प्राण जरी वाचले असले तरी गंभीर अवस्थेत या कैद्याला कारागृह प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या कैद्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून नागपूर येथुन या कैद्याचे नातेवाईक येत आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा कैदी यापुर्वी एका आत्महत्या केलेल्या कैदी असगर अली याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यास संबधीत तुरूंग अधिकारी वारंवार बेदम मारहाण करून छळवणूक करत असल्याची त्याची तक्रार असल्याचे समजते.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like