दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू?

नवी दिल्ली । इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातल्या दोन मोठ्या बँकांच्या खासगीकरणाची  चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यातही यावर सरकारच्या मंत्रिगटाची  चर्चा झाली. लवकरच या बँकाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत या संदर्भात झालेल्या नियामक आणि प्रशासकीय मुद्द्यांचा अहवाल निर्गुंतवणुकीबाबत निर्णय घेणाऱ्या पर्यायी यंत्रणेच्या मंत्रिगटासमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.
यांच्या उपस्थित झाली बैठक 
आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर खासगीकरणासाठी आवश्यक नियामक बदल केले जातील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रांमधील बँका आणि इतर उद्योगांमधला आपला हिस्सा विकून त्याद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021च्या अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती.

You May Also Like