धुळ्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घोषणाबाजी

काँगे्सतर्फे केंद्राच्या विरोधात आंदोलन
धुळे : पेट्रोल 100 रुपये लिटर झाले, डिझेल, गॅस इंधनाचे दर प्रचंड वाढले यामुळे महागाईचा भडका उडाल्याचा निषेध म्हणून धुळ्यात काँगे्रसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपावर काँगे्रस पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करुन केंद्र सरकाचा निषेध केला.

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये म्हणजे 258 टक्के आहे तर डिझेलवर 3.56 रुपये होती ती आज 31.80 रुपये आहे म्हणजे 820 टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात तब्बल 20 ते 25 लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. तसेच 2001 ते 2014 या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये याचे नाव तो 18 रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, असेही युवराज करनकाळ म्हणाले.

यावेळी रमेश श्रीखंडे, साबीर खान, मुजफ्फर हुसेन दोस्त महंमद, भिवसन अहिरे, इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदे, मुकुंद कोळवले हरी भाऊ चौधरी, नगरसेवक सद्दाम हुसेन, आलोक रघुवंशी, जाविद मल्टी, वानुबाई शिरसाठ, राजेंद्र खैरनार, फैसल अन्सारी, जाविद शाह, मुखतार अन्सारी, दिपक पाटील, प्रकाश शर्मा, कल्पना गुरव, सुनिता साळूंके आदी आंदोलन केले.

धुळे तालुका काँग्रेस तर्फे निदर्शने
फागणे येथे पेट्रोल व डिझेल भाव विरोधात आंदोलन करण्यात आले. रावसाहेब पाटील, कैलास पाटील, शिवाजी अहिरे, भाईदास पाटील भास्कर पाटील, भिकन पाटील, युवराज पाटील, राकेश पाटील, महेश अहिरे, कैलास अहिरे, आदी उपस्थित होते.

साक्रीतही काँग्रेसचे आंदोलन
साक्री । इंधन दरवाढीच्या निषेधार्थ साक्री येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डी.एस.अहिरे, भानुदास गांगुर्डे, धीरज आहिरे, सचिन सोनवणे, पंकज सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, प्रज्योत देसले, मुकेश पाटील, सागर देसले, राहुल प्रकाश उपस्थित होते. आंदोलन वेळी साक्री पोलिस स्टेशनचे पीएसआय बनसोडे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

You May Also Like

error: Content is protected !!