अभिमानास्पद ! महिंद्रा कर्मचार्‍यांच्या वारसांना देणार 5 वर्षांचा पगार

नवी दिल्ली : केंद्र, राज्य सरकार तसेच विविध कंपन्यांकडून अनेकविध उपाययोजना केल्या जात आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनेही कर्मचारी तसेच करोना रुग्णांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आलायं.

करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल, असे सांगितले जातंय. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्यांसाठी मदत जाहीर केली आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी पत्र लिहिले असून, यासंदर्भात माहिती दिलीयं. अनीश शाह यांनी महिंद्रा समुहातील सुमारे 25 हजार कर्मचार्‍यांना हे पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. यामध्ये कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. तसेच कंपनीने आपल्या कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचार्‍याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केलयं.

You May Also Like