अभिमानास्पद! सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली । अंतराळवीर कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळात झेप घेणारी सिरिशा दुसरी भारतीय वंशाची महिला अंतराळवीर ठरली आहे. सिरिशा अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. अंतराळ मोहिमेवर जाणार्‍या सहा जणांच्या पथकात दोन महिलांचा समावेश आहे. सिरिशासोबत आणखी एक बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

स्वप्न ही आयुष्यभर स्वप्न राहत नाहीत. ती खरी होतात. कारण ती सत्यात उतरवणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे स्वप्नांना सत्यात उतरवून देशाचं नाव अभिमानानं उंचावणार्‍या अशाच एका भारतीय कन्येचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या अंतराळ मोहिमेत भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला हीनं अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. व्हीएसएस युनिटी 22 स्पेसक्राफ्टचं न्यू मेक्सिको येथून यशस्वी उड्डाण झालं आहे. मिशन यशस्वी झाल्याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हर्जिन गॅलेक्टिकच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आला आहे.

अवकाशात स्थिरावल्यानंतर व्हर्जिन गॅलेक्टिकचे रिचर्ड ब्रेनसन यांनी एक व्हिडिओ शूट केला आहे. यात त्यांनी स्पेसक्राफ्टच्या यशस्वी उड्डाणाची माहिती दिली आहे. ब्रेनसन आणि सहकारी स्पेसक्राफ्टमध्ये आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियात सिरिशा बांदलाच्या यशाचं कौतुक केलं जात आहे.

 

You May Also Like