पुणे जिल्हा : बारामतीत टाळे उघडले, पण निर्बंध कायम

बारामती – करोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी बारामती शहर, तालुक्‍यामध्ये सुरू केलेल्या कडक लॉकडॉऊनची मुदत मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री संपत असल्याने बुधवारी (दि. 19) मे पासून बारामती शहर व तालुक्‍यात भाजीपाला व किराणा माल विक्रीसाठी तसेच

कृषी संलग्न व्यवसायाला सकाळी 7 ते 11 यादरम्यान सुरू राहतील तर हॉटेल व्यवसायिकांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत पार्सल सेवेला परवानगी देण्यात आली आहे;

बॅंका या नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहणार आहेत तर अन्य व्यवसाय; मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बारामती शहर व तालुक्‍यामध्ये सुरुवातीला पहिले 7 दिवस व त्यानंतर 7 दिवस असे एकूण 14 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.

यादरम्यान दवाखाने व मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. फक्‍त दूध विक्री सकाळी सात ते नऊ या दरम्यान सुरू होती. बारामती शहरात विनाकारण फिणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून अनेकांची वाहने ही जप्त केली होती.

या कडकडीत लॉकडॉऊनची मुदत मंगळवारी संपली तरी करोनाबाधितांचा आकडा अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याने प्रांताधिकारी कांबळे यांनी बारामती शहरातील ठराविक व्यापारी, अधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून वरील निर्णय घेतला.

नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!