भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा एकदा गुन्ह्यासंबंधित पुरावे गोळा करण्यासाठी जळगावात ठाण मांडून आहेत. दरम्यान पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशासक चैतन्य नासरे यांच्या उपस्थितीत मुख्य शाखेचे सील उघडले असून गुन्ह्यासंबंधित पुरावे गोळा केल्याची माहिती आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी को-ऑप सोसायटीच्या राज्यभरात शाखा आहेत. यातील पुणे येथील डेक्कन रोडवरील शाखेत घोटाळ्याझाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. हे पथक गेल्या सात महिन्यांपूर्वी जळगावातील मुख्य शाखेत दाखल झाल होत. त्या पथकाने याठिकाणाहून दोन ट्रकभर पुरावे घेवून पुणे येथे गेले होते त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२० रोजी या शाखेला सील ठोकले होते. त्यानंतर आज तब्बल सात महिन्यानंतर हे पथक पुन्हा गुन्ह्यासंबंधित पुरावे गोळा करण्यासाठी जळगावात ठाण मांडून आहेत.

बीएचआर घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात दाखल झाले आहे. सुमारे २० कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत बीएचआरचे सील उघडण्यात आले असून त्याठिकणाहून पथकाने पुरावे गोळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, बीएचआरच्या मुख्यशाखेत संपुर्ण राज्यभरातील बँकांचा डाटा होता. दरम्यान आज प्रशासक चैतन्य नासरे यांच्या उपस्थितीत पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सील उघडीत पुरावे शोधले असता, त्यांना सन २०१४-२०१५ च्या कालावधीमधील ठेवीदार व कर्जदारांच्या व्यवहारातील डाटाच उपलब्ध नसल्याचे त्यांना आढळून आले.

You May Also Like