क्वार्टर फायनल्समध्ये पीव्ही सिंधूने मिळवले स्थान

टोकियो । ऑलिम्पिकमधील सलग तिसरा सामना सिंधूने जिंकला आहे. सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवले आहे. राउंड ऑफ 16 च्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी पराभव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूने 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूने क्वॉर्टर फायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

 

 

दरम्यान, राउंड ऑफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 ने आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूने 21-13 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूने मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. दोन सेटमध्येच सिंधूने मियाचे आव्हान संपुष्टात आणले. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूने पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

You May Also Like